Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशNitish Kumar | महिलांबाबत केलेल्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून नितीश कुमार यांनी मागितली...

Nitish Kumar | महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून नितीश कुमार यांनी मागितली माफी; सभागृहात म्हटलं… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून नितीश कुमार यांनी मागितली माफी; सभागृहात म्हटलं…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांनी बिहारच्या विधानसभा सभागृहात माफी मागितली.

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांनी बिहारच्या विधानसभा सभागृहात माफी मागितली. ‘माझ्या विधानावरून जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं विधान मागे घेतो. माझ्या विधानावरून दिलगिरी व्यक्त करतो’, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

बिहार विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली असल्याचे सांगितले. नेमकं याचदरम्यान त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावरून बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलंय. असे असताना नितीश कुमार यांनी भर विधानसभेत आपल्या विधानावरून माफीनामा जाहीर केला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. आम्ही महिला शिक्षणावर भर देत आहोत. पण माझ्या विधानावरून जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं विधान मागे घेतो. माझ्या विधानावरून दिलगिरी व्यक्त करतो’.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments