Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच! आता इस्रायली लष्कराचा रिलीफ...

Israel Hamas War | इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच! आता इस्रायली लष्कराचा रिलीफ कॅम्पवर हल्ला, किमान 30 लोकं ठार | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच! आता इस्रायली लष्कराचा रिलीफ कॅम्पवर हल्ला, किमान 30 लोकं ठार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच! आता इस्रायली लष्कराचा रिलीफ कॅम्पवर हल्ला, किमान 30 लोकं ठार

गाझा प्रशासनाने दावा केला आहे की इस्रायलने तेथील एका मदत शिबिरावर हल्ला केला असून त्यात किमान 30 लोक ठार झाले आहेत. तर इस्रायलचे म्हणणे आहे की तेथे लष्कर उपस्थित नव्हते.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. मात्र, दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता, शनिवारी इस्रायली लष्कराने गाझा येथील निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला असून त्यात 30 जण ठार झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितले की, अल-अक्सा शहीद रुग्णालयात आणखी 30 मृतदेह आणण्यात आले आहेत. मध्य गाझा पट्टीजवळील अल मगजी कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर हमासने टेलिग्रामवर असेही म्हटले आहे की, इस्रायल सामान्य लोकांच्या घरांना लक्ष्य करत आहे. याशिवाय मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. एका ३७ वर्षीय पत्रकाराने सांगितले, माझे घर कॅम्पजवळ होते. हवाई हल्ल्यानंतर माझे घरही कोसळले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments