Ashok Nete Car Accident : खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भीषण अपघात, टिप्परने दिली जोरदार धडक

0
17
Ashok Nete Car Accident : खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भीषण अपघात, टिप्परने दिली जोरदार धडक


मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे मुंबईहून मध्यरात्री नागपुरला पोहचले. आज सकाळी ते नागपुरहून गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले असता विहिरीगावजवळ त्यांच्या कारला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक आणि आणखी एक व्यक्ती असे पाच लोक कारमध्ये बसलेले होते. अपघात होताच कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही. त्यानंतर आता सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अशोक नेते हे दुसऱ्या एका वाहनाने गडचिरोलीसाठी रवाना झाले. तसेच अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला हटवण्यात आले आहे.



Source link