मुंबईतील परळमध्ये तरुणीची आत्महत्या; गगनचुंबी इमारतीतून उडी मारत संपवली जीवनयात्रा

0
15
मुंबईतील परळमध्ये तरुणीची आत्महत्या; गगनचुंबी इमारतीतून उडी मारत संपवली जीवनयात्रा


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परळमधील लोढा पार्क रहिवासी संकुलात राहणाऱ्या एका तरुणीला मानसिक आजाराचा त्रास होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने अचानक इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली आहे. प्रकरणाची माहिती समजताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत तरुणीचा मृत्यू झालेला होता. मृत तरुणीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणीने मानसिक आजारामुळंच आत्महत्या केली की यामागे काही वेगळं कारण आहे?, याची चौकशी केली जात आहे.



Source link