
[ad_1]
चीन अनेकदा तैवान सीमेवर लष्करी सराव करत तैवानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. अनेकवेळा चीनची लढाऊ विमानेही तैवानच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. तैवानवर दबाव आणण्यासाठी चीनच्या या कुरापती सुरू असतात, असे लष्करी तज्ञांचे मत आहे. अलीकडेच, चिनी लष्कराचे द्वितीय क्रमांकाचे अधिकारी जनरल झांग याओशिया म्हणाले होते की, जर कोणी तैवानला त्यांच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
[ad_2]
Source link
