
पीडिताकडून १७ लाख रुपयांची मागणी –
सांगितले जात आहे की, मणिपूरमध्ये एका चिट फंड कंपनी प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तसेच अन्य सुविधा देण्याच्या नावावर पीडिताकडून १७ लाख रुपयांची मागणी करण्यात ली होती. यातील १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले. ही रक्कम देताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यालाही पकडण्यात आले आहे. अलवरमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाने खळबळ माजली असताना एसीबीचे अन्य अधिकारीही अलवरमध्ये दाखल होत आहेत.






