Premachi Goshta 2nd Nov: अहंकार बाजूला सारुन सागर मुक्तासोबत जाणार खरेदी करायला

0
23
Premachi Goshta 2nd Nov: अहंकार बाजूला सारुन सागर मुक्तासोबत जाणार खरेदी करायला


मुक्ता सागरच्या घरी जाते तेव्हा त्याला सांगते की सईला थोडं चांगले वाटेल असे काही तरी करायला हवे. ती तिला शॉपिंगला घेऊन जायचा प्लान करते. सागर देखील या प्लानमध्ये सहभागी होतो. पण मुक्ताला त्या सांगते की तुम्हाला या बाबत काहीही माहिती नव्हती असे वागा म्हणजे सईला बरे वाटेल. त्यानंतर सागर त्याचा अहंकार बाजूला ठेवून मुक्तासोबत सईला घेऊन शॉपिंगला निघतो. तेवढ्यात त्याची गाडी बंद पडते. मुक्ता त्याला तिच्या गाडीत बसण्यास सांगेत आणि सागर बसतो देखील. त्यानंतर अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मुक्ताची गाडी बंद पडते. मग मुक्ता त्या गाडीला धक्का देते. आता या सगळ्यामधून सागर आणि मुक्ता जवळ येणार का? सईबाबत सागरचे मत बदलणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.



Source link