
पतीने व्हिडिओ कॅालवर बोलताना पत्नीनं आयब्रो केलेल्या पाहिल्यानंतर तो भडकला आणि त्याने पत्नीला तीन तलाक दिला.
आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरुन जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातुही एक अशीच विचित्र घटना समोर आली आहे. येथे व्हिडिओ कॉल दरम्यान पत्नीच्या आयब्रो केलेल्या पाहून पती इतका संतप्त झाला की त्याने तिला सौदी अरेबियातून पत्नीला तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला.
नेमकं प्रकरण काय?
कुली बाजार येथील रहिवासी असलेल्या गुलसाबाने सांगितले की, तिचा विवाह 17 जानेवारी 2022 रोजी कोहना फुलपूर प्रयागराज येथील रहिवासी मोहम्मद सलीमसोबत अन्वरगंजमधील शालीमार गेस्ट हाऊसमध्ये झाला होता. लग्नादरम्यान 25 हजार रुपये हुंडा निश्चित करण्यात आला होता. गुलसाबा यांच्या म्हणण्यानुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी मोहम्मद सलीम कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता. त्यानंतर आम्ही रोज त्याच्याशी फोनवर बोलू लागलो.









