Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशKerala Blast | केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट...

Kerala Blast | केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट करण्यामागचं कारणही सांगितलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

Kerala Blast  | केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट करण्यामागचं कारणही सांगितलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट करण्यामागचं कारणही सांगितलं!

केरळमधील कलामासेरी येथील चर्च बॉम्बस्फोटातील आरोपीने आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने एफबी लाईव्ह केले आणि हा स्फोट का केला हे सांगितलं.

केरळमधील कलामसेरी येथील बॉम्बस्फोटातील (Kerala Blast ) आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण (accused surrendered) केले. डॉमिनिक मार्टिन असे आरोपीचे नाव आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आणि हे बॉम्बस्फोट का केले हेही सांगितले. रविवारी पहाटेच्या प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये लागोपाठ तीन बॉम्बस्फोट झाले ज्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

ख्रिश्चनांच्या ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाचा सदस्य असल्याचा दावा करणार्‍या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. ज्यात रविवारी सकाळी येथील कलामाश्चेरी येथे एका ख्रिश्चन धार्मिक मंडळात झालेल्या अनेक स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. व्हिडिओमध्ये, त्याने म्हण्टलं की संघटनेच्या शिकवणी देशासाठी चांगल्या नसल्यामुळे त्याने हे स्फोट घडवून आणले.”मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे आणि त्यांनी मला शोधत येण्याची गरज नाही,” असं त्याने म्हण्टंल.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments