
कोण आहे मॅथ्यू पेरी?
मॅथ्यू हा हॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ रोजी झाला आहे. मॅथ्यूचे वडील हे देखील अभिनेते होते आणि आई सुजैन मॉरिसन या पत्रकार होत्या. सुजैनने घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले होते. त्यामुळे मॅथ्यू हा एकटा राहत होता. मॅथ्यू हा अतिशय विनोदी अभिनेता म्हणून विशेष ओळखला जातो. त्याची ‘फ्रेंड्स’ ही मालिका जगभरात गाजली होती. या शिवाय त्याने ‘फूल्स रश इन’, ‘ऑलमोस्ट हीरोज’, ‘द होल नाइन यार्ड्स’, ‘१७ अगेन’ आणि ‘द रॉन क्लार्क स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच त्याने काही मालिकांची निर्मिती केली होती.








