
खानझादीसह सगळेच स्पर्धक अंकितावर आवाज चढवतात, हे बघून विकी जैनही संतापला. विकी अंकिताला म्हणाला की, ‘जर मी बाहेर टीव्ही पाहत असतो, तर मी अभिषेकवर हसलो नसतो. तू असं वागतेस म्हणूनच लोक तुझ्यावर ओरडतात, म्हणूनच ते लोक तुला फटकारतात. आणि म्हणूनच मन्नारासारखे मूर्ख लोक चार गोष्टी मला ऐकवतात.अशी लोकांकडे जाऊन जाऊन इज्जत मागायची आहे का? तुला जे हवं ते कर, तुला हे सगळं आवडतं असे, की कुणीही उठतं आणि आपल्या ऐकवतं. तू मला आयुष्यात काही देऊ शकत नाहीस, तर किमान मन:शांती तरी दे.’ आता विकी आणि अंकिताचं हे व=भांडण चांगलंच पेटणार आहे.







