
अर्जुन आणि सायली आता लवकरच एकमेकांपासून दुरावणार आहेत. आता देखील अर्जुन आणि सायलीमध्ये यावरून बोलणं होताना पाहायला मिळणार आहे. सायलीशिवाय अर्जुनला आता काहीच वस्तू हाती मिळणार नाहीयेत. अर्जुन त्याच्या वस्तू शोधत असताना तो सायलीला आवाज देऊन आपल्या वस्तूंबद्दल विचारणार आहे. तेव्हा सायली त्याला पुन्हा एकदा कराराची आठवण करून देणार आहे. पाच महिने संपले की आपल्यातलं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि मी इथून निघून जाईन. मग तुम्हाला तुमच्या वस्तू कशा मिळतील? तुम्ही आताच या सगळ्याची सवय करून घ्या, असा सल्ला ती अर्जुनला देणार आहे. मात्र, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अर्जुन तिला मागील कपाटातून त्याचं पुस्तक घेऊन येण्यासाठी सांगणार आहे.







