Bigg Boss 17 Promo: नाक कापून घ्यायला आलो नाही; अंकिताचे वागणे पाहून संतापला विकी

0
12
Bigg Boss 17 Promo: नाक कापून घ्यायला आलो नाही; अंकिताचे वागणे पाहून संतापला विकी


बिग बॉस शोमध्ये अंकिताचे वागणे हे खूप पजेसिव वाटत आहे. तर तिचा पती विकी उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. अंकिता सतत ‘तू माझ्याकडे लक्ष देत नाही. मला या घरात एकटे वाटत आहे. मला कायम असे वाटयचे की तू माझी ताकद आहेस पण असे अजिबात नाही’ अशी तक्रार विकीकडे करताना दिसत आहे. ते ऐकून विकी चिडतो आणि म्हणतो, ‘मी दिवसभर तुझ्या मागे फिरत बसू का? नाही करु शकत असे. मला स्वत:चे नाक कापून घ्यायचे नाही. तो तुझ्या आयुष्यातला रफ पॅच होता.’ लगेच अंकिता विकीला टोकते आणि म्हणतो, ‘प्रत्येक वेळी हा टॉपिक का काढतो.’ (कदाचित विकी हा सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअप विषयी बोलताना दिसत होता.)



Source link