Gaganyaan Mission update | इस्रोने अवकाशात पुन्हा इतिहास रचला, गगनयान मोहिमेच्या क्रू मॉडेलचं यशस्वी लाँचिग, दुसऱ्या प्रयत्नात मिळालं यश! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Gaganyaan Mission update | इस्रोने अवकाशात पुन्हा इतिहास रचला, गगनयान मोहिमेच्या क्रू मॉडेलचं यशस्वी लाँचिग, दुसऱ्या प्रयत्नात मिळालं यश! | Navarashtra (नवराष्ट्र)


इस्रोने अवकाशात पुन्हा इतिहास रचला, गगनयान मोहिमेच्या क्रू मॉडेलचं यशस्वी लाँचिग, दुसऱ्या प्रयत्नात मिळालं यश!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गगनयान मोहिमेचे क्रू मॉडेल यशस्वीरित्या लाँच केले आहे. अंतराळ संस्थेला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गगनयान मोहिमेचे क्रू मॉडेल यशस्वीरित्या लाँच केले आहे. अंतराळ संस्थेला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला मात्र तांत्रिक कारणामुळे तो पुढे ढकलावा लागला. मात्र, रात्री दहाच्या सुमारास दुसरा प्रयत्न करण्यात आला. आणि यावेळी इस्रोला यश मिळाले. गगनयानचे पहिले चाचणी वाहन अॅबॉर्ट मिशन-१ (टीव्ही-डी१) श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश येथून प्रक्षेपित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या प्रयत्नात गगनयान मोहिमेचं चाचणी उड्डाण

इस्रोने दिलेल्या अपडेट नुसार, या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे उड्डाण थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोला संबंधित पेलोडसह उड्डाण करणाऱ्या चाचणी वाहनामध्ये विसंगती आढळून आली आणि ती सुधारण्यात आली. त्यानंतर गगनयान मोहिमेचे चाचणी उड्डाण करण्यात आलं. यापूर्वी सकाळी 8 ला करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर खराब हवामान असल्याचं सांगत इस्रोनं वेळ पुढे ढकलली होती. त्यानंतर 8.45 वाजता ते सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते थांबवावं लागलं होतं. आता सकाळी 10.03 मिनिटानी हे क्रू मॉडेल यशस्वीरित्या लाँच करण्यात आलं आहे.






Source link