Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशDussehra 2023 | 300 वर्षांपासून महाराष्ट्रातील 'या' गावात दसऱ्याला केली जाते...

Dussehra 2023 | 300 वर्षांपासून महाराष्ट्रातील ‘या’ गावात दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा, ग्रामस्थांनी सांगितलं यामागच खास कारण! | Navarashtra (नवराष्ट्र)

Dussehra 2023  | 300 वर्षांपासून महाराष्ट्रातील ‘या’ गावात दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा, ग्रामस्थांनी सांगितलं यामागच खास कारण! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

300 वर्षांपासून महाराष्ट्रातील ‘या’ गावात दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा, ग्रामस्थांनी सांगितलं यामागच खास कारण!

सांगोला गावातील स्थानिक लोक सांगतात की, दरवर्षी दसरा हा सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्व लोक रावणाची पूजा करतात आणि महाआरतीचे आयोजन केले जाते.

दसरा (Dussehra 2023) सण चार दिवसांवर आला आहे. या दिवसाला विजयादशमी (Vijayadashami) म्हणूनही साजरा करतात. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला होता. तेव्हापासून या दिवशी रावणाचं दहन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु,हे गाव त्याला अपवाद आहे. यामागे एक खास कारण आहे. ते म्हणजे रावण हा खूप ज्ञानी होता,  रावणाच्या सद्गुणांमुळे या गावात रावणाची पूजा केली जाते. जाणून घेऊया गेल्या 300 वर्षापासून रावणाची पुजा करणाऱ्या अनोख्या गावाबदद्ल.

हे सुद्धा वाचा

अकोलातील ‘या’ गावात केली जाते रावणाची पुजा

विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा (दसरा 2023) अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी देशभरात रावण दहन केले जाते, परंतु महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोला गावात या दिवशी रावणाची पूजा आणि महाआरती केली जाते. येथे रावणाचा पुतळाही आहे, जो काळ्या दगडाचा आहे. जाणून घ्या या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी…

का करतात रावणाची पुजा?

अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची नित्यनेमाने पूजा केली जाते. गेल्या दोनशे वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. हा ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले, पण त्याच्या हातून घडली ही दशानन रावणाची मूर्ती! दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. ही मूर्ती घडवली तिथे असलेले दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड आणि अवचित घडलेली ही घटना ‘लंकेश्वराची मूर्ती’ हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. तेंव्हापासून आजपर्यंत येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते.

300 वर्षांपासून सुरू आहे परंपरा

सांगोला गावातील स्थानिक लोक सांगतात की, दरवर्षी दसरा हा सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्व लोक रावणाची पूजा करतात आणि महाआरतीचे आयोजन केले जाते. रावणाच्या आशीर्वादानेच गावात समृद्धी येते असे मानले जाते. रावण हा मोठा विद्वान होता असे लोक मानतात. ही परंपरा येथे 300 वर्षांपासून सुरू आहे. येथील लोक रावणासह भगवान श्रीरामाची पूजा करतात.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments