
यावेळी अजित पवारांनी २००८ साली सरकारने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृहमंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे. रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिले नाही. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी कधीही केल्या नाहीत. एखाद्याचे काम होत नसेल, तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो, पण चुकीचे काही काम करत नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली.






