
येरवडय़ात पुणे पोलिसांची तीन एकर जागा आहे. या जागेबाबत २०१० मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्तांनी मला दूरध्वनी केला आणि ‘दादांना तुम्हाला भेटायचे आहे’, असा निरोप दिला. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी येरवड्यातील तीन एकर जमिनीबाबत चर्चा झाली. ही जागा पुणे पोलिसांची आहे, भविष्यातील पुण्याचा वाढता विस्तार घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या जागेत पोलिसांचे कार्यालय बांधण्यात येणार आहे. तेथे पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे मी सांगितले, असे बोरवणकर यांनी म्हटले आहे. या जागेच्या लिलावातून शासनाला चांगला महसूल मिळणार असल्याचे त्या वेळी पालकमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहितीही बोरवणकर यांनी या पुस्तकात दिली आहे.






