OTT Binge Watch: विकेंडला कोणती सीरिज, चित्रपट बघू? तुम्हीही विचार करताय तर ‘हे’ खास तुमच्यासाठी…

0
18
OTT Binge Watch: विकेंडला कोणती सीरिज, चित्रपट बघू? तुम्हीही विचार करताय तर ‘हे’ खास तुमच्यासाठी…


अव्हेरनेस

‘अव्हेरनेस’ हा चित्रपट ‘इयान’ या तरुणाभोवती फिरणारा आहे. इयान हा समाजाचा विचार सोडून वडिलांसोबत राहणारा तरुण आहे. इयान इतरांचे मन वाचू शकतो आणि स्वतःच्या मार्गाने लोकांशी छोटे-मोठे खेळ करून पैसे कमवू शकतो. परंतु, त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे एक संशयित म्हणून सरकारी संस्था त्याच्या मागे लागते. येथून, इयानचे जीवन झपाट्याने बदलत जाते. तो या सर्व गोष्टींपासून सुटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला कळतं की, अशी क्षमता असलेला तो एकमेव व्यक्ती नाही. त्याच्या आजूबाजूला त्याच्यासारखे अजून बरेच लोक आहेत. ११ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.



Source link