Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी होणाऱ्या कपल्ससाठी खास जागा; २४ तास राहणार प्रेक्षकांची नजर!

0
19
Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी होणाऱ्या कपल्ससाठी खास जागा; २४ तास राहणार प्रेक्षकांची नजर!


‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासह आणखी काही जोड्या दिसणार आहेत. यातील काही जोड्यांनी यापूर्वीच्या सीझनमध्ये देखील भाग घेतला होता. परंतु, यावेळी त्यांना घरात वैयक्तिक जागा देखील दिली जाणार आहे. या ठिकाणी एकत्र बसून ते आपापसात काही योजना बनवू शकतात. यावेळी एका जोडप्याला दुसऱ्या जोडप्यासोबत एकत्र राहण्याची संधी मिळेल. इतकंच नाही तर, त्यांना वाटेल तेव्हा ते बिग बॉसशी थेट बोलू शकतील, असे देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.



Source link