
स्वरा ही आपली आणि वैदहीची मुलगी असल्याचं सत्य अजूनही मल्हारला कळलेलं नाही. मात्र, या दरम्यान कथेत शुभंकरची एन्ट्री झाली आणि नात्यांमधील ही गुंतागुंत आणखीनच वाढली होती. या सगळ्यात आता स्वराला मात्र नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. स्वराला मिळवण्यासाठी दोघांनीही केस केल्या आहेत. मात्र, आता स्वराची कस्टडी एनजीओकडे जाण्याची शक्यता आहे. एक एनजीओ स्वराची पूर्ण जबाबदारी घेणार असून, हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत स्वरा त्यांच्याकडे राहणार आहे. मात्र, त्या आधीच शुभंकर एक मोठं पाऊल उचलणार आहे.






