Raghav Chadha Delhi : राघव चड्ढांना मोठा धक्का, सरकारी बंगला रिकामा करण्याचे कोर्टाचे आदेश

0
42
Raghav Chadha Delhi : राघव चड्ढांना मोठा धक्का, सरकारी बंगला रिकामा करण्याचे कोर्टाचे आदेश


raghav chadha bungalow delhi : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता संसद सचिवालयानंतर कोर्टाने देखील राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश जारी केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने सरकारी बंगला तातडीने रिकामा न केल्याबद्दल राघव चड्ढा यांना चांगलंच सुनावलं आहे. राघव चड्ढा यांना टाईप ६ प्रकारचा बंगला मिळणं आवश्यक आहे. परंतु त्यांना टाईप ७ प्रकारचा बंगला मिळालेला आहे. माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल किंवा माजी केंद्रीय मंत्र्यांना टाईप ७ प्रकारचा बंगला देण्यात येत असतो. त्यामुळं आता राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.



Source link