Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशElection Commission on NCP | राष्ट्रवादी कोणाची? निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा,...

Election Commission on NCP | राष्ट्रवादी कोणाची? निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, तोपर्यंत चिन्ह गोठवू नका : शरद पवार गटाचा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)

Election Commission on NCP | राष्ट्रवादी कोणाची? निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, तोपर्यंत चिन्ह गोठवू नका : शरद पवार गटाचा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राष्ट्रवादी कोणाची? निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, तोपर्यंत चिन्ह गोठवू नका : शरद पवार गटाचा दावा

Election Commission Hearing on NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी लढाई सुरू आहे. राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगात पोहचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोग कार्यालयात दाखल झाले आहेत. अजित पवार गटाने दुसरा गट कसा बेकादेशीर आहे हे सांगण्यात आले तर शरद पवार गटाने निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा, असा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरी मोठी लढाई निवडणूक आयोगात पोहचल्याने संपूर्ण देशाचे लक्ष्य या निर्णयावर लागले आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर आता ही लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर अजित पवार गटाने आपली बाजू मांडली आहे. त्याचबरोबर गंभीर आरोप करीत शरद पवार त्यांच्या मर्जीने नियुक्त्या करतात, कोणतीही निवडणूक घेतली जात नाही, असा हल्ला देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे. आता शरद पवार गटाने निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, चिन्ह गोठवू नये असेदेखील सांगण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील दाखल झाले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments