
बॉलिवूडमधील शाहरुख खान, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी, मनीष मल्होत्रा, अर्पिता खान व आयुष शर्मा, सारा अली खान, सलमान खान आणि इतर काही कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. अनेक कलाकार एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यास अनेक कलाकार पोहोचले होते.








