
सायली आणि अर्जुनचे लग्न हे एका अटीमुळे झाले होते. सायलीची केस लढण्याची फी म्हणून त्याने तिला लग्न करण्याची अट घातली होती. सायली ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली, त्या आश्रमातील मुलांचा सांभाळ करणारे मधुभाऊ तिथल्या सगळ्याच मुलांचे बाबा बनले होते. मात्र, त्यांच्या या छोट्याशा आश्रमाच्या जमिनीवर काही वाईट लोकांची नजर पडली. आश्रमाची जमीन मिळवण्यासाठी रचलेल्या कटात एक खून झाला आणि या खुनाचा आळ मधुभाऊ यांच्यावर आला. याच आरोपात मधु भाऊ यांना अटक झाली. या खोट्या आरोपातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता.








