
[ad_1]
जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढतोय. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे मराठा समाजाला वारंवार आंदोलन आणि उपोषण करावे लागत आहे. सरकारने शब्द न पाळल्याने जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. मात्र, या ठिकाणी बळाचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी हवेत गोळीबार करत आंदोलकांना पळवून लावले.”
[ad_2]
Source link
