Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका! आंदोलकांनी बससह अनेक वाहने पेटवली, तुफान दगडफेक

0
16
Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका! आंदोलकांनी बससह अनेक वाहने पेटवली, तुफान दगडफेक


जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमुळे मराठा आंदोलन चिघळले आहे. येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांच्या मंडपात पोलीस घुसले व त्यांनी प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.



Source link