
‘मैं हूं ना’ हा चित्रपट २००४मध्ये रिलीज झाला होता. शाहरुख खानसोबतच अमृता राव, झायेद खान आणि सुनील शेट्टी हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. तर, सुष्मिता सेनची भूमिका खूपच लहान होती. पण त्या छोट्याशा भूमिकेत सुष्मिताने असा प्रभाव टाकला होता की, यश चोप्रानेही फोन करून अभिनेत्रीचे कौतुक केले. इतकंच नाही तर ‘मैं हूं ना’ रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई शहरातून या चित्रपटाचे जुने पोस्टर्स उतरवण्यात आले होते. त्याजागी शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांची जोडी असलेले नवीन पोस्टर्स लावण्यात आले होते.








