Ricky Kej: ग्रॅमी पुरस्कार विजेत्या रिकी केजने भारताला दिलेले राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन तुम्ही पाहिले का?

0
21
Ricky Kej: ग्रॅमी पुरस्कार विजेत्या रिकी केजने भारताला दिलेले राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन तुम्ही पाहिले का?


रिकीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जगातील भारतीयांसाठी ६० सेकंदाचा व्हिडीओ भेट म्हणून दिला आहे. त्याने हा व्हिडीओ लंडनमधील अतिशय प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडीओमध्ये जगातील सर्वात मोठ्या सिम्फनी ऑर्केस्ट्राद्वारे रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रिकीने, “काही दिवसांपूर्वी, मी लंडनच्या प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये भारताचे राष्ट्रगीत सादर करण्यासाठी १०० जणांचा ब्रिटिश ऑर्केस्ट्रा, द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. भारताचे राष्ट्रगीत रेकॉर्ड करणारा हा सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा होता. शेवटच्या ‘जय हे…’ ने माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले होते. भारतीय संगीतकार असल्याचा आनंद होतो. या स्वातंत्र्यदिनी मी हे ऐतिहासिक रेकॉर्डिंग तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आदराने वापरा, शेअर करा आणि पहा. ते आता तुमचे आहे. जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link