Thursday, October 1, 2026
Homeसातारापोकलॅन ब्रेकर चोरीतील संशयित जेरबंद | पुढारी

पोकलॅन ब्रेकर चोरीतील संशयित जेरबंद | पुढारी

[ad_1]

दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : दहिवडी येथील मुळीकवस्ती येथून जिहे कठापूरच्या पाणी पुरवठ्याचे काम करणार्‍या पोकलेन मशीनचा 13 लाख 33 हजार रुपये किंमतीचा ब्रेकर चोरीस गेल्याची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार दाखल होताच दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत सीसीटीव्ही फुटेज चेक करून चौघा संशयितांना जेरबंद केले. संशयितांकडून चोरीस गेलेल्या पोकलॅन ब्रेकरसह गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, एक चार चाकी गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविराज जयप्रकाश गायकवाड (वय 25, रा. दहिवडी), अनिल देवराम राठोड (वय 30, रा. तुपेवाडी दहिवडी), सुजित दिलीप कांबळे (वय 27, रा. ढोकळवाडी पोस्ट विखळे ता. खटाव, हल्ली रा. तुपेवाडी दहिवडी) व अक्षय किसन जाधव (वय 26, रा. चव्हाण वस्ती वावरहिरे ता.माण) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रविवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 5 ते दि. 24 जुलै रोजीचे सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान दहिवडी येथील मुळीक वस्ती येथून पोकलेन ब्रेकर चोरी झाल्याची फिर्याद श्रीनिवासराव सूर्यनारायणा रावपल्ली (रा. हैद्राबाद तेलंगणा) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती.

याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन जाणार्‍या रोडला व इतर परीसरात असणारे सुमारे 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरुन चोरट्यांची माहिती लक्षात आल्यावर चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेला 13 लाख 33 हजारांचा पोकलेन ब्रेकर व संशयतांनी यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी (क्र. एम एच 11डी.एच 1000), ट्रॉलीसह ट्रॅक्टर (क्र. के.ए 28 टी.ए 6205), चार चाकी (क्र. एमएच 12 क्यु.टी 3964) असा एकुण 76 लाख 33 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे, हवालदार बापू खांडेकर, धनंजय घाटगे, पोलिस नाईक स्वप्नील म्हामणे, पोलिस रामचंद्र गाढवे, अजिनाथ नरबट, सुहास गाडे, सागर लोखंडे, निलेश कुदळे यांच्या पथकाने केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments