
[ad_1]
अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या आहेत. अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना १२ हजार कोटी दिले. सूर्यफूल, कापूससाठी १ हजार कोटीची तरतूद केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाची लोक १६ हजार गावांपर्यंत गेले. कृषीमंत्री असताना सर्व मंत्र्यांनी मदत केली. एक वर्ष कृषीमंत्री म्हणून चांगलं काम केले. एक वर्षात कृषी मध्ये चांगले काम करणारे हे पहिले सरकार आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाच्या आमदाराला एवढी मोठी संधी देणे, खूप मोठी गोष्ट आहे.
[ad_2]
Source link
