Saturday, October 10, 2026
Homeसातारासातारा : पिंपोडे बुद्रुक येथे कृषी औषधे-खताच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान...

सातारा : पिंपोडे बुद्रुक येथे कृषी औषधे-खताच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान | पुढारी

[ad_1]








पिंपोडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे बस स्टँड नजिक असलेल्या मे.अग्रो हायटेक या कृषी बी-बियाणे,औषधे व रासायनिक खते विक्रीच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे पंचवीस लाखांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मे.अग्रो हायटेक हे कृषी खते, बियाने व औषध विक्रीचा अनिल ढोले यांचा व्यावसाय आहे. पिंपोडे बुद्रुक येथील नेताजी पाटील हे व्यवसाय पाहतात. हा व्यवसाय दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या इमारतीत आहे. बुधवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्याने दुकानातून धुर येऊ लागल्याचे पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. याची माहिती झाल्यावर लोक जमा झाले. तत्पूर्वी इमारतीत राहायला असणाऱ्या दतात्रय महाजन व त्यांच्या पत्नी सुधा महाजन यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती विझवण्याचे धाडस होत नव्हते. किसनवीर कारखाना, वाइ नगरपरिषद व अन्य ठिकाणचे अग्निशमन बंब यावेळी बोलावण्यात आले. मात्र ते वेळेत पोहोचले नाहीत. तोपर्यत पिंपोडेचे माजी सरपंच जनार्दन निकम, संतोष लेंभे यांनी स्वतःचे टँकर आणले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. संपूर्ण दुकान जळून बेचिराख झाले. किमान पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments