Sunday, October 4, 2026
Homeसाताराअजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर | पुढारी

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर | पुढारी

[ad_1]








सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज (सोमवार) प्रथमच सातारा जिल्ह्यात येत आहेत. कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी जाऊन ते अभिवादन करणार असून, त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांना असून, त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. शरद पवारांसोबत पक्षाचे नेते, आमदार, खासदार असणार आहेत. त्यामुळे पवारांसोबत आज कोण कोण आहे आणि अजित पवारांसोबत कोण कोण आहे हे आजच्या शक्तीप्रदर्शनातून दिसून येणार आहे.

दुपारी साताऱ्यात होणाऱ्या मातंग परिषदेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांचे आज सातारा जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल दिसणार असून, पवारांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते जमा होतील असे नियोजन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments