Thursday, October 1, 2026
HomeसाताराSatara Crime: जेवण दिले नाही म्हणून भाच्याने केला आत्‍याचा खून | पुढारी

Satara Crime: जेवण दिले नाही म्हणून भाच्याने केला आत्‍याचा खून | पुढारी

[ad_1]








सातारा: पुढारी वृत्तसेवा: आत्तीने जेवण दिले नाही, या कारणातून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृध्द आत्तीचा खून केला. बसापाचीवाडी (ता. सातारा) येथे  (Satara Crime) ही घटना आज (दि.३०) उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. वत्‍सला नामदेव बाबर (वय ७०) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे. हरिभाऊ सुरेश चव्‍हाण (वय ३०, दोघे रा. बसापाचीवाडी ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत (Satara Crime)  प्राथमिक माहिती अशी की, आत्ती व भाचा दोघे एकत्र गावात राहत होते. हरिभाऊ किरकोळ कामे करत होता. त्‍याला दारुचे व्‍यसन असून त्‍यातून नेहमी दोघांमध्ये भांडण होत होती. सोमवारी रात्री उशीरा त्‍याने जेवण मागितल्‍यानंतर आत्तीने दिले नाही. त्यामुळे त्याने लाकडी दांडक्‍याने आत्तीला मारहाण केली. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

खूनाची घटना मंगळवारी समोर आल्‍यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेवून संशयिताला दुपारी ताब्यात घेतले. पोलिसांचा घटनास्‍थळाचा पंचनामा झाल्‍यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्‍हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. दुपारी गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments