Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!

0
17
Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!


मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा पठाण अर्थात शाहरुख खानने स्वत: या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीर सिंहकडे गेला आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, शाहरुख खानला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारशी रुचलेली नाही. त्याला असे व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत, ज्यात प्रेक्षकांना आवडेल असाच मसाला असेल. तर, त्याच्या या यादीत ‘डॉन’ चित्रपट कुठेच बसत’ नव्हता. तर, रणवीर सिंह याने याआधी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत ‘दिल धडकने दो’ आणि ‘गली बॉय’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीरकडे गेला आहे.



Source link