
सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आधीच्या सगळ्या सिझन्सला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्या या कार्यक्रमात ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकते याची प्रचिती मागील सिझन्समुळे सगळ्यांना आली आहे. यंदाही ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.










