Friday, November 27, 2026
Homeफलटणसमतानगर विडणी येथील पंचशील बुद्ध विहारात संविधान दिन उत्साहात साजरा

समतानगर विडणी येथील पंचशील बुद्ध विहारात संविधान दिन उत्साहात साजरा

समतानगर विडणी येथील पंचशील बुद्ध विहारात संविधान दिन उत्साहात साजरा

विडणी : मौजे समतानगर, विडणी येथील पंचशील बुद्ध विहारात कार्तिक पौर्णिमेनिमित्त न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका यांच्या माजी कार्यकारिणीच्या वतीने बुद्धपूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी, न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्तिक पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व विशद करण्यात आले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील आणि धम्मप्रसाराच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांच्या स्मरणाशी पौर्णिमांचे विशेष नाते जोडले गेले आहे. कार्तिक पौर्णिमा ही बुद्धांच्या धम्मकार्याचे स्मरण करण्याची, त्यांच्या शिकवणीचे चिंतन करण्याची आणि धम्माचरणाचा संकल्प दृढ करण्याची संधी मानली जाते.

बुद्धांच्या शिकवणीनुसार प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचा अंगीकार करून अंधश्रद्धा, अज्ञान व दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग स्वीकारणे, हाच पौर्णिमेच्या निमित्ताने घेण्यासारखा खरा बोध आहे. केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता बुद्धांच्या विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करणे, मैत्री, समता आणि बंधुतेची भावना जोपासणे, हा या दिवसाचा संदेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात बुद्धपूजा व वंदना सूत्रपठण करण्यात आले. यानिमित्ताने न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने उपस्थितांना खीरदान करण्यात आले.

समतानगर येथे वर्षावासापासून सुरू झालेली धम्मप्रवचन, बुद्धवंदना आणि विविध धम्मविषयक उपक्रमांची परंपरा बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेनंतरही सातत्याने सुरू आहे. अशा उपक्रमांमधून परिसरात धम्मजागृती, सामाजिक एकोपा आणि बुद्धविचारांचा प्रसार होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments