Sunday, November 22, 2026
Homeमहाराष्ट्रकामगार कल्याण मंडळाचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

कामगार कल्याण मंडळाचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी मंडळाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ घ्यावा – अध्यक्षा गायत्री शेट्टी यांचे आवाहन

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन, सहकारनगर, पुणे येथे रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी माननीय श्री. राकेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय हॉस्पिटल, पुणे येथील आरोग्य सेविका सौ. गायत्री शेट्टी होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. उमेश बरदे, श्री. आतिश भोसले, श्री. गणेश भोसले आणि श्री. अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात सौ. गायत्री शेट्टी यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत, कामगारांनी मंडळाच्या विविध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मंडळाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्याचा व्यापक प्रचार आणि प्रसार होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. संदीप कांबळे यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. चालू आर्थिक वर्षात पुणे विभागातील जास्तीत जास्त कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रतिभा एरब यांनी केले. यावेळी मंडळाचे कर्मचारी श्री. विकास पवार, श्रीमती रंजना भाटे यांच्यासह कामगार भवन, सहकारनगर येथील लाभार्थी कामगार आणि कामगार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ८८ वर्षांच्या कार्याचा गौरव करणारा हा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments