धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान असून धम्माचा विचार समाजापर्यंत पोहोचविणे हीच खरी आदरांजली – सोमीनाथ घोरपडे
कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धम्मप्रबोधनपर व्याख्यान व अभिवादन कार्यक्रम
फलटण : कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी धम्मप्रबोधनपर व्याख्यान व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव तथा बौद्धाचार्य सोमीनाथ घोरपडे यांनी ‘धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. अन्नदान, वस्त्रदान, औषधदान आणि निवारा देणे ही सर्व दाने महत्त्वाची आहेत; मात्र धम्मदान माणसाला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. अज्ञान दूर करून दुःखाचे स्वरूप, त्याचे कारण आणि दुःखमुक्तीचा मार्ग समजावून सांगते. धम्माचा विचार माणसाच्या अंतःकरणात परिवर्तन घडवून आणतो आणि त्याला योग्य जीवनमार्ग दाखवतो. त्यामुळे धम्माचा विचार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांपर्यंत पोहोचविणे, हेच खऱ्या अर्थाने धम्मदान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी धम्मपदातील तण्हावग्गामधील,
‘सब्बदानं धम्मदानं जिनाति।’
या गाथेचा अर्थ विशद करताना अनाथपिंडकाचा जीवनप्रसंग सांगितला. धम्मश्रवणातून माणसाच्या जीवनात कशा प्रकारे परिवर्तन घडते आणि धम्माची प्रेरणा माणसाला दान, सेवा व समाजकल्याणाच्या कार्याकडे कशी प्रवृत्त करते, याचे विवेचन त्यांनी केले.
कार्यक्रमात कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या आठवणी, विचार आणि सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला. आयु. आनंदराव आढाव सर, आयु.सचिन मोरे सर, आयु. राजू गायकवाड सर आणि आयु. दीपक आढाव गोविंद दूध संघ गुणवरे चे चेअरमन शिवाजी लंगुटे अण्णा, आयु. जी पी गावडे साहेब सहाय्यक निबंधक उपायुक्त सोलापूर जिल्हा,कांतालाल आढाव बजाज ऑटो चे निवृत्त कर्मचारी, यांनी आपली मनोगते व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी विधीचे संचालन, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे व माजी श्रामणेर आयु.दीपक आढाव यांनी केले. यावेळी कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या सहचारिणी आयुनि मालन आढाव, आयुनि शुभांगी गायकवाड, आयु. अमोल आढाव, आयुनि मोनाली आढाव, आयु.विशाल आढाव, आयुनि उमा विशाल आढाव, भाऊ आयु. शांताराम आढाव, आयु. सुरेश आढाव बहीण आयुनि लक्ष्मी सोनवणे, आयुनि फत्तीबाई भोसले व नातवंडे, पुतणे आयु. दीपक आढाव, आयु. मिलिंद आढाव, पुतणी आयुनि स्वाती शिंद, जावई संदीप शिंदे, आयुनि रुपाली सोनवणे आणि सोनाली भोसले, पुतणे सुनिल आढाव, मेहुणे आयु. विश्वास मोरे असे कुटुंबिय उपस्थित होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार आयु. महावीर भालेराव यांनी आशीर्वाद गाथा व सरणत्तय घेऊन कालकथित लालासो सायबू आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर, विद्यमान अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे सर, संघटक आयु. विजय भोसले सर, नानासो गौण्ड, हिरामण आढाव, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद आढाव, आरपीआय विश्वास भोसले,एकता दर्शन चे ऋषिकेश आढाव, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अंगरक्षक मनोज हरिभाऊ आढाव, साहेबराव आढाव, झुंबर आढाव, बागेवाडीचे बागायतदार सागर वाघमोडे, रुपेश घुले, मुकेश आढाव, गाडी मालक चालक संघटना चे संग्राम धाईंजे, प्रमोद बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप
कालकथित लालासो सायबू आढाव यांच्या स्मृती चिरंतन जपण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या भावनेतून त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी बस्कर पट्ट्या, वीस खुर्च्या तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप केले. या उपक्रमातून शिक्षण आणि बालसंस्काराच्या कार्याला हातभार लावण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
लालासो सायबू आढाव यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच धम्मविचार, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक कार्याचा संदेश देणारा हा प्रथम स्मृतिदिनचा कार्यक्रम ठरला.
