फलटण प्रतिनिधी साहस Times :- .”धम्म चळवळीच्या प्रत्येक हाकेला धावून येऊ “आदर्श शिक्षक सत्कार कार्यक्रमात शिक्षकांनी व्यक्त केली मनोगते."बुद्ध भीम संदेश अध्यापक गीतमंच फलटण" व "भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण" आयोजित तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी आदर्श शिक्षकांनी अत्यंत उत्कटतेने आपली मनोगते व्यक्त केली. बुद्ध भीम संदेश अद्यापक गितमंच फलटण आणि भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण यांच्या या स्तुत्य उपक्रमाची कौतुक करत यापुढे "धम्म चळवळीच्या प्रत्येक उपक्रमाच्या हाकेला धावून येत, तन, मन आणि धनानी सहभागी होऊ " अशी ग्वाही देत. आम्हांला या चळवळीत सहभागी होण्याची संधी द्यावी अशी विनंती केली. तालुका स्तरीय आदर्श शिक्षक सत्कार कार्यक्रमात एकूण 17 शिक्षकांचा सत्कार, निकाळजे, श्रीनिवास धाईंजे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या नानासो मोहिते, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सातारा (पूर्व) यांच्या अध्यक्षतेखाली, सुजाता गायकवाड जिल्हा अध्यक्ष महिला, भारतीय बौध्द महासभा सातारा, तालुका अध्यक्ष रंजना रणवरे मॅडम, भिमराव लोंढे तालुका अद्यक्ष भा. बौद्ध महासभा शाखा फलटण, माजी विस्तार अधिकारी शं ज्ञा कांबळे, अरुण गायकवाड हिशोब तपासणीस महाराष्ट्र राज्य, सोमीनाथ घोरपडे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष, दादासो कांबळे, जिल्हा संघटक अर्जुन ननावरे, राजकुमार रणवरे कोषाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरचिटणीस केशव ठोंबरे, कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, सचिन रोकडे, भिकू भोसले आदी मोठ्या संख्येने शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोळकी बुद्धविहार फलटण या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमांची सुरवात त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुतीने झाली. उपस्थितांचे स्वागत होऊन, बुद्ध भीम संदेश अद्यापक गितमंचाच्या वतीने भिमराव लोंढे यांनी प्रास्ताविक करताना, "धनापेक्षाही तन मनाने या धम्म चळवळीत प्रत्येक आदर्श शिक्षकाने आपल्या परीने योगदान देणे महत्त्वाचे आहे. आदर्श शिक्षक म्हणून हीच मोठी आपली जबाबदारी असेल." असे आवाहन केले. प्रस्ताविकात केलेल्या या आवाहनाला प्रत्येक आदर्श शिक्षकांनी आपल्या मनोगतात उत्तर देताना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत, " तुम्ही आम्हाला केव्हाही हाक द्या, आम्ही निश्चितपणे, तर मन आणि धनाने त्या हाकेला धावून येऊ " अशी मते व्यक्त केली. या कार्यक्रमात एकूण 17 आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये, बबन विश्वनाथ निकाळजे केंद्रप्रमुख राजाळे, ज्योती सुरेश वाघमारे आदर्की बुद्रुक, शोभा जगन्नाथ झेंडे दडसवस्ती, सागर शिवाजी मोरे नाईकबोमवाडी, श्रीकांत मानसिंग मोरे वनदेवशेरी, अशोक विठ्ठल मोरे पंचबिघा, दीपक गुलाबराव मोरे बागेवाडी, संजय नाथा भोसले तावरेनगर, सागर आबासो लोंढे मिरढे, नितीन मुकुटराव जगताप जावली, मयूर नानासो बनसोडे सोनवडी खुर्द, राजानंद बापूराव आढाव मिंडवस्ती, शितल राजेंद्र प्रसाद निकाळजे गोळेवाडी, तात्या अशोक आढाव इंगळेवस्ती, विठ्ठल दत्तात्रय काकडे गोंदवले बुद्रुक, अमोल बाळासो भोसले घाडगेमळा, मनीषा महेंद्र माने लाकडी (बारामती) अशा 17जणांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन, सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येकांना आपली मनोगते व्यक्त करण्याची संधीही देण्यात आली. घरचा सत्कार स्वीकारताना प्रत्येकांनी आपण भारावून गेल्याचे, अभिमानाने भरून आल्याचे व हा सत्कार पुरस्कारापेक्षा अनमोल असल्याने गीतमंच आणि बौध्द महासभेचे ऋण व्यक्त केले.
आदर्श शिक्षक आणि राजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख बबन निकाळजे साहेब यांनी बुद्ध भीम संदेश अध्यापक गीत मंचाचे कौतुक करताना हा स्तुत्य उपक्रम कायम चालू ठेवावा आणि आपणही चळवळीला कोणतीही मदत करण्याची कबुली देत, मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले सर यांनी आदर्श शिक्षकांना उदबोधित करताना, आंबेडकरी कोणती का चळवळ असेना ती चालली पाहिजे, टिकली पाहिजे, कारण ते लढण्याचे,आपले विचार व्यक्त करण्याचे विचारपीठ आहे. आपले आदर्श घेऊन, आपल्या सामर्थ्यानिशी समाजासमोर आपण उभे राहिले पाहिजे. असे केल्याने,काहीच न सांगता सुद्धा केवळ तुम्हाला पाहून सुद्धा समाज घडवता येईल. हे बाबासाहेबांनी दिलेले उदाहरण देत, मार्मिक हाक देत आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मोहिते सर यांनी बौद्ध महासभेची काळानुसार बदललेली आदर्श धोरणं. Bsi 25 संबधी माहिती देत.भा बौद्ध महासभेत सक्रिय व्हावे हे आवाहन व त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. या सुंदर शिस्तबद्द कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास धाईंजे सर यांनी केले. तर अल्पोपहारापूर्वी रचनाबद्द आणि देखण्या कार्यक्रमाचे अरविंद निकाळजे सर यांनी आभार मानले.
