पायल बापूराव मोहितेची धावणे, लांब उडी, गोळाफेक व थाळीफेकमध्ये चमकदार कामगिरी; विद्यार्थ्यांनी पटकावले अनेक प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक
तोंडले | प्रतिनिधी : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी तोंडले केंद्राच्या स्पर्धा भैरवनाथ विद्यालय, तोंडले येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परतवडीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
वैयक्तिक क्रीडा प्रकारातील यश
लहान गट मुली :
- ६०० मीटर धावणे – सनाया संतोष मोहिते – द्वितीय क्रमांक
मोठा गट मुली :
- १०० मीटर धावणे – पायल बापूराव मोहिते – प्रथम क्रमांक
- २०० मीटर धावणे – पायल मारुती जाधव – प्रथम क्रमांक
- ४०० मीटर धावणे – प्रगती शिवाजी मोहिते – तृतीय क्रमांक
- ६०० मीटर धावणे – पायल बापूराव मोहिते – प्रथम क्रमांक
- ८०० मीटर धावणे – पायल मारुती जाधव – प्रथम क्रमांक
मोठा गट मुले :
- १०० मीटर धावणे – तेजस दिलीप जाधव – प्रथम क्रमांक
- २०० मीटर धावणे – तन्मय गणेश नामदास – द्वितीय क्रमांक
- २०० मीटर धावणे – विवेकानंद रोहिदास मोहिते – तृतीय क्रमांक
- ४०० मीटर धावणे – शिवम मारुती जाधव – प्रथम क्रमांक
- ६०० मीटर धावणे – तोफिक करीम फौजदार – प्रथम क्रमांक
- ८०० मीटर धावणे – फिरोज करीम फौजदार – प्रथम क्रमांक
मैदानी क्रीडा प्रकारातही विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
लांब उडी – मोठा गट मुली :
पायल बापूराव मोहिते – प्रथम क्रमांक
पायल मारुती जाधव – द्वितीय क्रमांक
लांब उडी – मोठा गट मुले :
तेजस दिलीप जाधव – प्रथम क्रमांक
शिवम मारुती जाधव – द्वितीय क्रमांक
गोळाफेक – मोठा गट मुली :
पायल बापूराव मोहिते – प्रथम क्रमांक
पायल मारुती जाधव – द्वितीय क्रमांक
गोळाफेक – मोठा गट मुले :
सुयश शिवाजी मोहिते – प्रथम क्रमांक
थाळीफेक – मोठा गट मुली :
पायल बापूराव मोहिते – प्रथम क्रमांक
पायल मारुती जाधव – द्वितीय क्रमांक
थाळीफेक – मोठा गट मुले :
तन्मय गणेश नामदास – प्रथम क्रमांक
सुयश शिवाजी मोहिते – द्वितीय क्रमांक
परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी झळाळी मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, क्रीडा सराव तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा. पिसे साहेब, विस्ताराधिकारी गंबरे साहेब, केंद्रप्रमुख झणझणे मॅडम, मुख्याध्यापिका साळवे मॅडम, उपशिक्षिका पवार मॅडम, विषय शिक्षक सुस्तरफोड सर तसेच ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे क्रीडा क्षेत्रात यशाची वाटचाल सुरू ठेवावी आणि शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
