Sunday, September 27, 2026
Homeफलटणभाद्रपद पौर्णिमेनिमित्त समतानगरात धम्म वंदना कार्यक्रम

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त समतानगरात धम्म वंदना कार्यक्रम

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त समतानगरात धम्म वंदना कार्यक्रम

विडणी : वर्षावास प्रवचन मालिका (आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून समतानगर (विडणी) येथील विहारात मंगलमय वातावरणात धम्म वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने समतानगर यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामुदायिकरित्या बुद्ध पूजा व धम्म वंदना केली. त्यानंतर भाद्रपद पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतील करुणा, मैत्री, प्रज्ञा, शील आणि समतेची मूल्ये आचरणात आणण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

वर्षावासाच्या निमित्ताने सुरू असलेल्या प्रवचन मालिकेत अशा सामुदायिक धम्म उपक्रमांमुळे विहारामध्ये भक्तिमय आणि चिंतनशील वातावरण निर्माण झाले आहे. धम्मवंदनेच्या माध्यमातून बुद्धांच्या विचारांचे स्मरण करून धम्माचरणाची प्रेरणा घेण्यात आली.

या कार्यक्रमास समतानगर परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments