Saturday, September 26, 2026
Homeफलटणभाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी,आयु. चंद्रकांत मोहिते

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी,आयु. चंद्रकांत मोहिते

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी
— आयु. चंद्रकांत मोहिते

कोळकी : बुद्ध फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह, कोळकी येथील विहारात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त उपोसथ व्रताचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी उपोसथ व्रताचे महत्त्व, भगवान बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार याबाबत उपासिका व महिलावर्गाला मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना आयु. चंद्रकांत मोहिते म्हणाले की, बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका अत्यंत प्रभावी असते. त्यामुळे महिलांनी धम्माचा अभ्यास करून तो आपल्या आचरणातून कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविल्यास सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते.भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी

“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो,” ही संकल्पना केवळ कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता महिलांनी सामाजिक आणि धम्मकार्यातही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिलांच्या सहभागातून कुटुंबाची, समाजाची आणि पुढील पिढीची प्रगती साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

या उपोसथ कार्यक्रमास आयुनि. कांतीताई काकडे, आयुनि. रजनी सुहास माने, आशा संजय काकडे, आयुनि. सुषमा भिकू भोसले, पूजा अशोक बनसोडे, प्रियांका संजय माने, आयुनि. रुचिता चंदन काकडे, आरती विशाल पाटील, आलिशा शुभम अहिवळे, माया जयप्रकाश अहिवळे, आयुनि. मयुरी सुशिल काकडे, प्राजक्ता सागर काकडे, आयुनि. प्राजक्ता सुनीत कांबळे, आयुनि. रोहिणी हिरवाळे, आयुनि. विद्या खंदारे, आयुनि. अक्षदा लोंढे आणि आयुनि. छाया लोंढे यांच्यासह उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने उपोसथ व्रताचे पालन करत उपस्थितांनी धम्मविचार आत्मसात करून बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि समतेच्या मूल्यांचा जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments