Friday, September 25, 2026
HomeUncategorizedश्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज "श्रीं"...

श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज “श्रीं” चे प्रस्थान

श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज “श्रीं” चे प्रस्थान
फलटण : फलटणचा राजा असा लौकिक असलेल्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन सोहळ्याची फलटणकरांना उत्सुकता लागली आहे. अत्यंत आकर्षक आणि देखण्या अशा ‘रामेश्वर रथा’तून श्रींचे आज सायंकाळी ठीक ७:३० वाजता विसर्जनासाठी प्रस्थान होणार आहे. समस्त फलटणकरांचे श्रद्धास्थान असलेला प्रथम मानाचा गणपती असलेल्या व सर्वाधिक जुने मंडळ असलेल्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेली श्रींची प्रस्थान मिरवणूकही भव्य स्वरूपात काढण्यात येणार आहे.
श्रींच्या प्रस्थानासाठी विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘रामेश्वर रथा’ची आकर्षक सजावट करण्यात आली असून, या रथातून विराजमान श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मिरवणुकीत विविध कलात्मक चित्ररथ, आकर्षक विद्युत सजावट, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.
विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित चित्ररथांच्या माध्यमातून श्रीमंत रामेश्वर महागणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक ही फलटणकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. फलटणच्या राजाच्या आज होणाऱ्या या भव्य प्रस्थान सोहळ्याकडे फलटण शहरासह परिसरातील गणेशभक्तांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments