Thursday, September 17, 2026
Homeफलटणश्रेया प्रमोद मानेचे बुद्धिबळात जिल्हास्तरीय विजेतेपद!

श्रेया प्रमोद मानेचे बुद्धिबळात जिल्हास्तरीय विजेतेपद!

श्रेया प्रमोद मानेचे बुद्धिबळात जिल्हास्तरीय विजेतेपद!
फलटण : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धेत कमला निंबकर बालभवनची विद्यार्थिनी श्रेया प्रमोद माने हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जिल्ह्याचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील सात फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई करताना श्रेयाने तीन आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धकांवर मात केली. तिच्या या दमदार कामगिरीमुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे.

श्रेया माने हिने बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला तर प्रज्ञा गांधी हिने १७ वर्षाखालील गटात ७ पैकी ४ फेरीत जिंकून निकराची झुंज देऊन प्रयत्न केले.

श्रेयाच्या व प्रज्ञाच्या या यशाबद्दल कमला निंबकर बालभवनच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षिका निता सस्ते तसेच पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

श्रेयाला आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटू, स्पर्धा आयोजक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक प्रमोद लालासो माने यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमोद माने हे प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन प्रशालेत वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
श्रेयाच्या बुद्धिबळातील या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि विभागीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments