Wednesday, September 2, 2026
Homeफलटणकोरेगाव उत्तर विभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी ८ सप्टेंबरला जनता दरबार

कोरेगाव उत्तर विभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी ८ सप्टेंबरला जनता दरबार

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली; आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव उत्तर विभागातील सर्व गावांतील नागरिकांच्या विविध शासकीय व प्रशासकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ८ सप्टेंबर २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या विविध विभागांशी संबंधित प्रश्न, अडचणी व तक्रारींची दखल घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनता दरबारासाठी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था आज सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. सर्व गावांतील कार्यकर्त्यांकडे जमा झालेले अर्ज तसेच जनता दरबारामध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ग्रामपंचायत कार्यालय, पिंपोडे बुद्रुक येथे दिलेल्या वेळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज स्वीकारण्यासाठी आमदार सचिन पाटील यांच्या स्वीय सहायकांसह सहकारी कर्मचारी संबंधित वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

कोरेगाव उत्तर विभागातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमित रणवरे, विधानसभा प्रमुख, २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments