Sunday, August 30, 2026
Homeफलटणज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी...

ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

फलटण | प्रतिनिधी:- सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्त्व दिवंगत प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात प्रा. आढाव यांच्या बहुआयामी कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत स्मृतिदिन संस्कार विधीने होईल. त्यानंतर ११.०० ते १२.०० या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रा. आढाव यांच्या व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व आणि समाजासाठीच्या योगदानावर स्मृतिपर मनोगत व्यक्त करतील.

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागरिक, सहकारी, मित्रपरिवार, पत्रकार, साहित्यप्रेमी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments