Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रतुकाराम महाराज पालखी मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती; अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १०...

तुकाराम महाराज पालखी मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती; अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम वेगात

तुकाराम महाराज पालखी मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती; अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम वेगात

अकलूज | प्रतिनिधी :-तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये पालखी मार्ग सुरक्षित व सुकर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तसेच पावसामुळे चिखल साचला आहे, अशा सर्व ठिकाणी मुरूम टाकून रोलरच्या साह्याने रस्ते समतल करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

या कामाकडे अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे आणि नगरसेवक विलास काका क्षिरसागर हे स्वतः विशेष लक्ष देत असून कामाची नियमित पाहणी करत आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

कामाची गती आणि दर्जा कायम ठेवत संपूर्ण प्रभागातील आवश्यक ठिकाणी मुरूम टाकून रस्ते सुस्थितीत करण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे आणि नगरसेवक विलास काका क्षिरसागर यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. नागरिकांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त करत पालखी सोहळ्यापूर्वी करण्यात आलेल्या या कामाचे स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments