पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

0
2
पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा गौरव; विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सत्कार

इंदापूर | प्रतिनिधी : गणेश धनवडे :-इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (ता. इंदापूर) येथील वाणिज्य विभागप्रमुख प्रा. योगेश मारुती खरात यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

प्रा. खरात यांनी डॉ. भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इम्पॅक्ट ऑफ फूड डिलिव्हरी स्टार्टअप्स ऑन हॉटेल इंडस्ट्री इन पुणे’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून ही पदवी प्राप्त केली.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. विलास बुवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, राही रणसिंग आणि शंकर रणसिंग यांनी प्रा. खरात यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले. भविष्यातही शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले की, प्रा. योगेश खरात यांनी संपादन केलेली विद्यावाचस्पती पदवी ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मोलाची भर असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि संशोधन संस्कृतीला नवी उभारी मिळणार आहे.