Sunday, August 23, 2026
Homeफलटणरोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले; रणरागिणी संस्थेच्या पुढाकारातून MILTON Solar कंपनीचे प्रशिक्षण...

रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले; रणरागिणी संस्थेच्या पुढाकारातून MILTON Solar कंपनीचे प्रशिक्षण व रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले; रणरागिणी संस्थेच्या पुढाकारातून MILTON Solar कंपनीचे प्रशिक्षण व रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

फलटण | प्रतिनिधी :- रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या पुढाकारातून MILTON Solar Limited कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला प्रशिक्षण व रोजगार मेळावा गुरुवारी हॉटेल महाराज एक्झिक्यूटिव्ह येथे उत्साहात संपन्न झाला. सातारा जिल्ह्यातील महिला व पुरुषांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

मेळाव्यासाठी MILTON कंपनीचे स्पेशल ट्रेनर श्री. कुणाल पाटील यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी कंपनीची कार्यपद्धती, सोलर क्षेत्रातील वाढत्या संधी तसेच प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याविषयी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे देत शंकानिरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापक सौ. रझिया शेख यांनी केले. यावेळी MILTON कंपनीचे पार्टनर श्री. मुबारक शेख यांचा संस्थेचे संचालक श्री. अप्पासाहेब कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या वतीने श्री. मुबारक शेख यांना सातारा जिल्ह्यात प्रशिक्षण आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. संस्थेच्या विनंतीचा मान राखत मुंबईमध्ये होणारे प्रशिक्षण फलटणमध्ये आयोजित करून जिल्ह्यातील युवक-युवतींना मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी MILTON कंपनीचे मार्केटिंग पार्टनर श्री. दत्ता कोकरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी श्री. कुणाल पाटील, श्री. मुबारक शेख, श्री. दत्ता कोकरे, श्री. संजय उबाळे, श्री. शैलेश म्हात्रे, श्री. विजय कांबळे, श्री. किरण घुगरे तसेच महिला कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

तसेच रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संस्थापक सौ. रझिया शेख, संचालक श्री. अप्पासाहेब कापसे, मा. प्राचार्य शाहीन शेख, सचिव श्री. मारुती टकले, खजिनदार श्री. कैफ शेख, श्री. महेंद्र सपकाळ, श्री. सतीश देसाई, मानवाधिकार फाउंडेशन भारतचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रणधीर भोसले, प्रगती चळवळीचे पत्रकार श्री. प्रदीप सस्ते, श्री. बजरंग गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यात सहभागी झालेल्या अनेक महिला व पुरुषांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक सौ. रझिया शेख यांनी MILTON कंपनीचे प्रतिनिधी, उपस्थित मान्यवर तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व महिला-पुरुषांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments