
जलनायक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर : दुष्काळमुक्त पश्चिम महाराष्ट्राच्या वाटचालीतील योगदान
फलटण : सन १९९५ च्या दरम्यान २२ अपक्ष आमदार यांना एकत्रित करून आम्हाला मंत्रीपद नकोय फक्त पाणी द्या म्हणून फलटण च्या मुधोजी क्लब च्या मैदानातून केलेली ललकार आज खरी होताना दिसत आहे यांचे सर्व क्रेडिट मा.श्रीमत रामराजे यांच्या भू- गर्भा च्या अभ्यासाला जाते म्हणून तर महाराजांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले पाहिजे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांनी २००४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ( महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष) असा कार्यभार सांभाळला. त्यांच्या अभ्यासू नेतृत्वामुळे व धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र राज्याच्या जलसिंचन क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी बदल झाले.
त्याच्या कारकिर्दीतील जलसंपदा विभागांचे निर्णय आणि राजकीय प्रवाहातील काही गोष्टी अधोरेखित करता येतील.
( १) . कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बळकटीकरण::
श्रीमंत रामराजे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ( १९९५) आणि नंतर जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले,या काळात त्यांनी विभागांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सिंचन प्रकल्पांना ( विशेषतः पश्चिम महाराष्ट्र) गती देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
त्या वेळी मुख्यमंत्री म्हणून कै.मा. मनोहरपत जोशी, उप मुख्यमंत्री कै. मा . गोपीनाथ मुंडे व कै. मा. अजितदादा पवार साहेब मंत्री महोदय व महाराष्ट्र सरकार च्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून तर पश्चिम महाराष्ट्र व काही भागातील दुष्काळी परिस्थिती बदलली हे नाकारता येणार नाही.
(२) सिंचन प्रकल्पांना गती आणि निधी उपलब्धता::
पावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी आणि दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी उपसा सिंचन योजनांवर विशेष भर देण्यात आला. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू यासारख्या महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांच्या कामांना त्यांच्या कारकिर्दीत अभूतपूर्व गती मिळाली.
( ३) विद्युत देयके आणि टंचाई निवारण ::
उपसा सिंचन योजनांच्या वाढत्या वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी टंचाई कार्यक्रमातून व विशेष निधीतून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली.जेणेकरुन शेतकरी वर्गाला विनाखडीत पाणी पुरवठा उपलब्ध होईल.
( ४) प्रशासकीय व कायदेशीर निर्णय ::
जलसंपदा आणि सिंचनाशी संबंधित कायदेशीर बाबींवर त्यांना विशेष अधिकार होता.महामडाळाच्या विरोधात गेलेल्या प्रकरणांवर योग्य न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात योग्य वकिलांची नियुक्ती करण्यासारखे धोरणात्मक कायदेशीर निर्णय महाराजांनी घेतले .
(५) पारदर्शकता आणि नियमन मडळ ::
महाराज साहेब अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या नियामक मंडळाच्या बैठकांमध्ये सिंचनाचे पाणी वाटप, प्रकल्पग्रस्त आणि अतिरिक्त जमिनी महसूल विभागांकडे वर्ग करण्याबाबत अत्यंत पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.
दुष्काळ निवारणासाठी श्रीमंत रामराजे यांचे योगदान :: *धोम- बलकवडी आणि नीरा* *देवघर प्रकल्प कार्यान्वित करण्यात* *महाराज साहेब यांचा मोलाचा* *मोठा राजकीय* व *प्रशासकीय पुढाकार* आहे.या धरणाच्या निर्मितीमुळे व कालवे व्यवस्थापनामुळे *फलटण* , *माळशिरस, सांगोला व पंढरपूर या अनेक* वर्षे दुष्काळी राहिलेल्या तालुक्यांना मुबलक पाणी उपलब्ध होत आहे.
आत्ता चे काही लवंगी फटाक्यांसारखे काही नेते श्रीमंत रामराजे यांच्या अभ्यासू व दूरदृष्टी च्या वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व चा त्रिवेणी संगमाचा करिष्मा पाहून वैफल्यग्रस्त झालीत म्हणून सदैव टिका टिप्पणी करत असताना आपल्याला दिसत आहे, एक मात्र खरं आहे… सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नही …!!
कृष्णा खोरे पाणी वाटपात कृष्णा खोरे तील अतिरिक्त व न वापरल्याला पाण्याचा प्रश्न त्यांनी लावून धरला होता , म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचनात मोठा फरक पडला आहे., याबाबत शासनदरबारी सर्व माहिती उपलब्ध आहे हे नाकारता येणार नाही.
बारमाही शेती आणि आर्थिक सुबत्ता सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दुष्काळी पट्ट्यात बागायती शेती आणि फळबागा बहरु लागल्या मुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य व समृद्धी वाढीस लागली.
सर्वात महत्त्वाचे आजच्या तरुणाईला जे स्वच्छ खळखळून वाहणारे पाणी दिसत आहे या मागचा संघर्ष दिसत नाही तो त्यांनी आपल्या वडिलधाऱ्यान कडून घ्यावा, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीत जलसंपदा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे हे शब्द सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखं आहे. त्याच्या या दूरदृष्टीमुळे पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी लढणाऱ्या अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटण्यास मदत झाली आहे म्हणून तर या जलनायक ला भारतरत्न हा पुरस्कार देऊन देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान झाला पाहिजे….!!!
देशातील राजकारण सन २०१४ पासून वेगळ्या पद्धतीने सुरू आहे ते आजही जाणवत आहे तरी सुद्धा विधान परिषद चे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीत बाबत आजही सस्पेन्स कायम ठेवला आहे,आज सुद्धा महायुती सरकार चे विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अ.प .) चे ज्येष्ठ सदस्य म्हणून कार्यरत आहेत .
विशेषतः पश्चिम महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात .
फलटण च्या नाईक निंबाळकर या राजघराण्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे २९ वे वंशज आहेत .
सन २०१५ पासून ते विधान परिषदेचे सभापती होते, त्यानंतर
राजकारणात येण्यापूर्वी ते कायद्याचे प्राध्यापक होते, सन १९९१ ला फलटण च्या नगराध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाल्यानंतर सन १९९५ मध्ये फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले,युती शासनाच्या काळात स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद श्रीमंत रामराजे यांच्या कडे सोपवण्यात आले त्याच दरम्यान त्यांनी २०ते २२ अपक्ष आमदार यांना एकत्र करून आपल्या नेतृत्वाचे लाॅजिक दाखवून अनोखं काॅमनमॅन चे मॅजिक सिध्द करून दाखवले ते आजपर्यंत सातत्याने सातारा जिल्ह्यातील आपलं राजकीय वजन वाढवून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केले, अपवाद अलिकडील काही वर्षांच्या काळात राजकारणाचा किती चिखल झाला व श्रीमंत रामराजे यांच्या नावाने काही मंडळी खूपच वैफल्यग्रस्त झाली आहे तरी सुद्धा तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने आपली सेवाभावी भरारी आजही फिनिक्स पक्षा 🐦 प्रमाणे उंच उंच भरारी घेईल हे मात्र निश्चित…!!!
वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे…. सुंदर फलटण….मी फलटण कर










